Ad will apear here
Next
‘गझल माणसाची प्रवृत्ती श्रीमंत करते’
डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन
भूषण कटककर यांच्या दोन पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी(डावीकडून) श्रीकृष्ण कटककर, यशश्री कटककर, म. भा. चव्हाण, प्रमोद आडकर, श्रीपाल सबनीस, व भूषण कटककर.

पुणे : ‘मानवतावादाची ज्योत तेवत राहावी, यासाठी गझल झटत असते. गझल वेदना नाकारत नाही, तर स्वीकारते व क्षमाशीलही होते. यातूनच मानवी प्रवृत्ती श्रीमंत होण्यास हातभार लागतो,’ असे प्रतिपादन डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर लिखित बेफिकिरी व कथाकारी या गझल व कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
 
‘कवींचा धर्म किंवा जात बघणे अन्यायकारक आहे. त्यांना वैश्विक जाणिवेतून व सांस्कृतिक एकात्मतेच्या परिप्रेक्ष्यातून बघायला हवे. कटककरांची गझल प्रामाणिक आहे. मराठी रसिकांना अस्सल दाद देणे अजूनही शिकावेच लागत आहे, याची मात्र खंत वाटते,’ असेही डॉ. सबनीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘व्यक्तिरेखांच्या जिवंतपणावर कथेचे यश अवलंबून असते. प्रतिभासंपन्न लेखक परंपरेच्या चौकटीत वावरत नाही. अतिशय गंभीर विषय सूचकपणे मांडणे ही हातोटी लेखकांनी आत्मसात करायला हवी. कटककरांच्या कथा वाचून व त्यातील चिंतनसूत्रे पाहून हादरून जायला होते.’

या वेळी ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण, अॅ ड. प्रमोद आडकर, यशश्री कटककर व भूषण कटककर उपस्थित होते. 

अॅड. आडकर म्हणाले, ‘दैवदत्त देणगीचा अचूक वापर करून कलानिर्मिती करण्यातच कलाकाराच्या आयुष्याचे सार्थक आहे.’ 

म. भा. चव्हाणांनी दोन्ही पुस्तकांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

लेखक भूषण कटककर म्हणाले, ‘आपल्यातील प्रतिभा क्षमता ओळखून वेळीच तिचे साहित्यिक आविष्कार समाजासमोर आणणे हे लेखक व कवींचे कर्तव्य आहे. वेदना हा लेखनाचा पाया असायला हवा. लेखन हातून होऊन गेल्यावर लेखकाने त्याबाबत तटस्थ व्हायला हवे’. 

या वेळी यशश्री कटककर यांच्या हस्ते सुप्रिया जाधव, प्रज्ञा महाजन, निशिकांत देशपांडे, स्वाती सामक, दीप्ती जोशी, सुनीति लिमये, मुक्ता भुजबले व चिन्मयी चिटणीस यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात झालेल्या गझल मुशायऱ्यात डॉ. कैलास गायकवाड, शांताराम खामकर, प्रमोद खराडे, मिलिंद छत्रे, वैभव कुलकर्णी, सुप्रिया जाधव व प्राजक्ता पटवर्धन सहभागी झाले होते. 

दीप्ती जोशी व डॉ. कैलास गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. मुक्ता भुजबले व चिन्मयी चिटणीस यांनी आभार मानले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZVJCA
Similar Posts
‘सांस्कृतिक पुण्याईनेच विश्वशांती सुरक्षित’ पुणे : ‘हिंसा, विकृती, अत्याचार ही नैसर्गिक प्रवृत्ती असली तरी, प्रेम आणि अहिंसा या सांस्कृतिक पुण्याईनेच विश्वाची व मानवाची शांतता सुरक्षित राहू शकते आणि समाजाचा विकास शक्य होतो,’असे मत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. समाधान गायकवाड लिखित आणि यशोदीप पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित ‘काळजातील काव्यप्रक्षेपण’
‘काचखड्यांची नक्षी’ या ललितसंग्रहाचे प्रकाशन पुणे : करम प्रतिष्ठान प्रस्तुत ‘प्राजक्तवेणा’ या कार्यक्रमात प्राजक्ता पटवर्धन लिखित ‘काचखड्यांची नक्षी’ या ललितसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी भूषण कटककर, सुप्रिया जाधव, म. भा. चव्हाण, वर्षा कुलकर्णी व प्राजक्ता पटवर्धन यांची विशेष उपस्थिती असेल.
‘नागरिक हे साध्या वेषातील पोलिसच’ पुणे : ‘शहरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दल सज्ज आहे. दामिनी पथक, मार्शल, भरोसा सेल, पोलीस दीदी यासारख्या अनेक प्रभावी योजना राबवल्या जात आहेत;मात्र महिलांनीही काळजीपूर्वक वावरणे व गुन्हा घडत आहे हे लक्षात येताच तत्काळ प्रखर विरोध करणे ही गुन्हा रोखण्याची पहिली पायरी आहे.
कौमार्य चाचणी विषयावर मुलाखतीचे आयोजन पुणे : कौमार्य चाचणी या विषयावर आधारित मुलाखतीचे आयोजन २९ जून रोजी करण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेत होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन करम प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language